भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात रसायनशास्त्र पदव्युत्तर विभागाचा स्वागत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी प्राचार्य डॉ. कणसे यांच्या शुभास्ते डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी प्राचार्यांसह प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र विषयातील विविध करिअरच्या संधी, संशोधन क्षेत्र आणि रसायनशास्त्राच्या व्यापक व्याप्तीबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना उपदेश करताना पुढे ते म्हणाले की, हा स्वागत समारंभ सर्वांसाठी नव्या मैत्रीची, नव्या ज्ञानाची, नव्या संधींची आणि नव्या स्वप्नांच्या प्रवासाची सुंदर सुरुवात ठरणार आहे. महाविद्यालयात वर्षभर अनेक उपक्रम राबविले जातात त्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. आर. सुपले यांनी विद्यार्थ्यांना संशोधन पद्धती, संशोधनाची योग्य दिशा, संशोधनातील विविध टप्पे, वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच संशोधन करताना आवश्यक असणाऱ्या बाबींविषयी मौलिक मार्गदर्शन केले. तसेच डॉ. सचिन माने आणि डॉ. टी. आर. लोहार यांनी विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र विषयाचे महत्त्व थोडक्यात स्पष्ट केले.
याप्रसंगी नवप्रवेशीत प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगते व्यक्त केली. हा स्वागत समारंभ यशस्वी करण्यासाठी डॉ. विश्वंभर शिंदे, कु. वर्षा साळुंखे, संध्याराणी वडगावे, स्नेहल पाटील तसेच विभागातील शिक्षकेतर सेवक यांनी विशेष परिश्रम घेतले.
कु. आकांक्षा चव्हाण हिने कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन कु. अनुराधा जाधव व श्रावणी मलपे यांनी केले. तर आभार श्री. कासम सनदी याने मानले.





